परराज्यात जाऊ इच्छिणार्यांची भाजपने भागविली तहान
पनवेल ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परराज्यात जाऊ इच्छिणार्यांसाठी विशेष ट्रेनची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी मेडिकल रिपोर्टची अट ठेवण्यात आल्याने पनवेलमध्ये आरोग्य केंद्राबाहेर नागरिकांनी भर उन्हात रांगा लावल्या होत्या. या नागरिकांना तासन्तास उभे राहावे लागल्याने सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या सूचनेनुसार त्यांना पनवेल महानगरपालिका भाजप युवा मोर्चा सरचिटणीस केदार भगत यांनी पाणी वाटप करून त्यांची तहान भागवली. या वेळी त्यांच्यासोबत राजेंद्र भगत, सचिन भगत, प्रमोद भगत आदी उपस्थित होते.