Breaking News

कोरोना टेस्टिंग लॅबसाठी आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडून 50 लाखांचा निधी

नवी मुंबई ः वार्ताहर

नवी मुंबईत कोरोना टेस्टिंग केंद्र ब लॅब उभारण्याकरिता बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी 50 लाखांचा निधी दिला आहे. तसे पत्र त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर व नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना दिले आहे.प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न करूनही नवी मुंबई शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. खासगी तसेच पालिका रुग्णालयात कोरोना टेस्ट केल्यास ते मुंबईला जे. जे. किंवा हाफकीन या ठिकाणच्या लॅबमध्ये पाठविले जाते. त्यामुळे रिपोर्ट येण्यास आठ दिवस लागत आहेत. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेता नवी मुंबईमध्येच जर कोरोना टेस्टिंग केंद्र व लॅब उभारल्यास त्याचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त होऊन कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  बेलापूर मतदारसंघात सर्व सुविधांयुक्त असे कोरोना टेस्टिंग केंद्र व लॅब उभारणे आवश्यक आहे. असे केंद्र उभारल्यास संपूर्ण नवी मुंबईकरांना त्याचा फायदा होऊन पालिकेला नागरिकांच्या टेस्ट करणे सोपे जाणार आहे. बाधितांचे अहवाल लवकर प्राप्त होऊन बाधितांची साखळी वेळीच रोखण्यास मदत होऊ शकते, असे आपल्या आमदार फंडातील 50 लाख रुपये देताना आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रात नमूद केले आहे.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply