Breaking News

…तर फुप्फुसांच्या आजारांचे व्हाल शिकार!

आयर्न शरीरातील महत्त्वपूर्ण घटकांपैकी एक आहे. शरीरात आयर्नची कमतरता असल्यास एनिमियाची समस्या उद्भवण्याचा धोका असतो. एनिमिया या आजारात व्यक्तीच्या शरीरात रक्ताच्या कमतरतेसह पेशी कमी होण्याची समस्या उद्भवते. अलिकडे करण्यात आलेल्या रिसर्चनुसार फुप्फुसांमध्ये आयर्नचं प्रमाण वाढल्यामुळे अस्थमासारखा गंभीर आजार होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला या रिसर्च बाबत सविस्तर माहिती सांगणार आहोत.

आयर्नमधील पोषक घटकांची शरीराला आवश्यकता असते. हिमोग्लोबिन सिंथेसिसमध्ये आयर्नची भूमिका महत्त्वाची असते. शरीरातील हिमोग्लोबिन एक असा घटक आहे ज्यामुळे ऑक्सिजन सुरळीतपणे शरीरातील अवयवांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे ऊर्जा निर्मीतीची प्रक्रिया व्यवस्थित होते.

आपल्या खाण्या-पिण्याचा परिणाम आरोग्यावर होत असतो. आहारातूनच शरीराला आयर्नचा पुरवठा होत असतो, पण आयर्नचे सेवन जास्त केल्यामुळे शरीराला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे रक्तवाहिन्यामध्ये आर्यन जास्त प्रमाणात जमा होत जाते. त्यामुळे रक्तवाहिन्या सुरळीतरित्या काम करीत नाहीत. आयर्नचे प्रमाण फुप्पुसांच्या पेशींमध्ये जास्त झाल्यास अस्थमाची समस्या निर्माण होऊ शकते.

तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार फुप्फुसांमध्ये आयर्नचे प्रमाण जास्त झाल्यामुळे इन्फ्लेमेशनची समस्या निर्माण होऊ शकते. इन्फ्लेमेशन म्हणजेच सूज आल्यामुळे म्यूकस तयार होऊन श्वास घ्यायला त्रास होतो. त्यामुळे अस्थमाची लक्षणे दिसायला सुरुवात होऊ शकते. अशा स्थितीत रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, कारण फुप्फुसांना ऑक्सिजन मिळणे पूर्णपणे बंद होते.

जर तुम्ही शरीरातील आयर्नची कमतरता पूर्ण करण्यासाठी नैसर्गिक खाद्यपदार्थांचा समावेश करीत असाल तर आरोग्याला कोणताही धोका नसतो, पण जर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कॅप्सूल किंवा आयर्नच्या गोळ्यांचे सेवन करत असाल तर जीवघेणे ठरू शकते. त्यामुळे डॉक्टरांच्या मार्गदर्शनानंतर आयर्नच्या गोळ्यांचे सेवन करा.

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply