Breaking News

ओंकार अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनकडून महापौर सहाय्यता निधीत मदत

पनवेल : बातमीदार

पनवेल महानगरपालिकेच्या महापौर सहाय्यता निधीत खांदा कॉलनीतील ओंकार अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनने 10 हजार रुपयांची मदत बुधवारी (दि. 6) जमा केली.

कोरोनाशी लढण्यासाठी आज सर्वच थरातून उपाययोजना केल्या जात आहेत. संपूर्ण मानवजातीवर आलेले हे संकट पाहून समाजातील छोटे छोटे घटक देखील आपापल्या परीने मदत करत आहेत. जिथे सोसायट्यांना मेंटनन्स मिळणे मुश्किल असते. वारंवार कळवूनही सभासद वार्षिक मेंटनन्स देत नसतात अशा वेळी एक सोसायटी एकमताने पुढाकार घेऊन आर्थिक मदत करते ही बाब नक्कीच

कौतुकाची आहे.

नागरिकांनी किमान मदत नको परंतु लॉकडाऊनचे पालन करणे घरीच राहणे, सोशल डिस्टन्सिंग पालन करणे ही माफक अपेक्षा जरी पूर्ण केली तरी आपण कोरोनाला हरवू शकतो असे सोसायटीचे सचिव व खजिनदार आयुक्त गणेश देशमुख यांचेशी बोलताना म्हणाले. जास्तीत उद्योगपती, कंपन्यांनी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पनवेल मनपास मदत करावी, असे आवाहन उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी केले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply