Thursday , March 23 2023
Breaking News

तारानजीक अपघात; मायलेक मृत्युमुखी

पनवेल : वार्ताहर मुंबई-गोवा महामार्गावर पनवेल तालुक्यातील तारा गावाजवळ असलेल्या युसूफ मेहरअली सेंटर येथे एका टँकरने दुचाकीला दिलेल्या धडकेत मायलेकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. 17) दुपारी घडली. या अपघातप्रकरणी टँकरचालकावर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रोशन बबन भौड (वय 24), पुष्पा बबन भौड (वय 45, दोघेही रा. बांधनवाडी) अशी मृत मायलेकांची नावे आहेत. हे दोघे खालापूर येथून घरी येत होते. युसूफ मेहरअली सेंटरजवळ दुपारी 12.30च्या सुमारास त्यांच्या दुचाकीला (एमएच 46-बीसी 3452) टँकरने (जीजे 06-एएक्स 7272) पाठीमागून धडक दिली. या अपघातामध्ये भौड मायलेकाचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Check Also

नैना प्राधिकरणाने जनहिताबाबतची भूमिका स्पष्ट करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची अधिवेशनात मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त नैना प्राधिकरण जर जनतेच्या हिताचा …

Leave a Reply