अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातून परराज्यात जाणार्या स्थलांतरित मजूर, कामगारांसाठी पनवेल येथून ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना पनवेल स्थानकापर्यंत सोडण्यासाठी एसटी बसेसदेखील प्रशासनाने उपलब्ध करून दिल्य. गुरुवारी (दि. 7) ओरिसाकडे जाणार्या स्थलांतरित 1200 मजुरांना अलिबाग, मुरूड, पेण, पनवेल येथून बसेसमधून रवाना करण्यात आले. अलिबागमधून 154 मजूर ओरिसाला रवाना झाले.
गुरुवारी दुपारी 12 वाजता अलिबाग एसटी आगारातून चार बसेस या मजुरांना घेऊन पनवेलला रवान झाल्या. पनवेल येथून हे कामगार रेल्वेने ओरिसाला जातील. या वेळी बसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात येत होते. या सर्वांची खाण्याची सोयही करण्यात आली होती. सर्वांची वैद्यकीय प्रमाणपत्र तपासूनच बसमध्ये प्रवेश देण्यात येत होता.
जिल्हाधिकारी निधी चौधरी स्वतः सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून होत्या. अप्पर जिल्हाधिकारी भारत शितोळे, उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, तहसीलदार सचिन शेजाळ या वेळी उपस्थित होते.
Check Also
उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये
आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …