
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल येथील प्रजापिता ब्रह्माकुमारिज विश्वविद्यालया ईश्वरीय सेवा केंद्र यांजकडून नवीन पनवेल सेक्टर 16 पोदी येथे 225 जणांना जेवण देण्यात आले. या वेळी पनवेल सेवा केंद्रप्रमुख तारादीदी, डॉ. शुभदा नील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, नगरसेवक तेजस कांडपिळे, तसेच सेवा केंद्रातील अनेक जण उपस्थित होते. लॉकडाऊनमध्ये उपाशी असलेल्यांना जेवण देण्याचा हा स्तुत्य उपक्रम असून 17 मे पर्यंत रोज दुपारी हे जेवण देण्यात येणार आहे.