मोहोपाडा ः वार्ताहर
चौक तुपगावमधील होतकरू आणि सामाजिक कार्याची आवड असणार्या तरुणांनी भाजपच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन शनिवारी (दि. 2) भाजपत जाहीर प्रवेश केला.
या वेळी तुपगावातील प्रतीक सुभाष गुरव, जयेंद्र राजेंद्र गुरव, नागेश प्रकाश खरात, मोहन गजानन गुरव, चैतन्य कैलास कुंभार यांनी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या कार्यावर प्रभावित होऊन विनोद साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
या वेळी खालापूरच्या माजी सभापती मधुमती गुरव, ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते रामदास साळवी, उद्योजक रवींद्र आपटेकर, नंदू सोनावणे, दत्ताजी हातनोलकर, सदाशिव साळवी, अमोल गुरव, विजय ठोसर, विशाल तांबोळी, संतोष गावडे, सोपान आपटेकर व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतीक गुरव यांची तुपगाव भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी जयेंद्र गुरव, कार्याध्यक्षपदी नागेश खरात यांची नियुक्ती करण्यात आली. या वेळी पदाधिकार्यांना नियुक्तिपत्रे देण्यात आली.