पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोनाच्या संकटकाळात सकारात्मक वातावरण निर्मितीसाठी भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा कामोठे मंडलतर्फे ‘वक्ता महाराष्ट्राचा’ या आशयाखाली ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी ‘स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज’, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर’, ‘युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद’, आजची शिक्षण पद्धती-आधुनिकीकरण की बाजारीकरण’, ‘कोरोना महामारीनंतर आधुनिक भारतातील युवकांपुढील आव्हाने’ आणि ‘भारतीय राजकारणात युवकांची भूमिका व स्थान’ असे सहा विषय आहेत. स्पर्धेत फक्त कामोठे शहरातील स्पर्धक भाग घेऊ शकतात. त्यासाठी वयोमर्यादा 16 ते 35 वर्ष इतकी आहे.
स्पर्धेतील विजेत्यांसाठी प्रथम पारितोषिक तीन हजार रुपये, द्वितीय दोन हजार रु. आणि तृतीय पारितोषिक एक हजार रु. आहे. स्पर्धकांनी जास्तीत जास्त पाच मिनिटांचा व्हिडिओ बनवून तो भाजप युवा मोर्चा कामोठे या फेसबुकच्या पेजवर जाऊन वकृत्व स्पर्धेच्या बॅनरखालील कमेंटमध्ये (हीींिीं://ा.षरलशलेेज्ञ.लेा/र्सीेीिी/ 1419773414909493? र्ींळशु=शिीारश्रळपज्ञळव= 2710616415825180) 30 मेपर्यंत पोस्ट करावा. त्यानंतर बक्षीस वितरणाची तारीख कळविली जाईल. स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Check Also
केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …