Breaking News

पनवेल मनपाचा कोरोनाविरुद्ध लढा

स्थायी समितीने दिले प्रशासनाला आर्थिक बळ

पनवेल : प्रतिनिधी
कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आवश्यक असलेली जंतूनाशके, कीट व इतर साहित्य खरेदीला आणि तात्पुरत्या स्वरुपात कर्मचारी नेमण्यासाठी लागणार्‍या आर्थिक तरतुदीला मान्यता देऊन प्रशासनाच्या सोबत लोकप्रतिनिधीही असल्याचे दाखवून दिल्याचे स्थायी समितीच्या सभेनंतर अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी सांगितले. या सभेत पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली आहे.  
पनवेल महापालिका स्थायी समितीच्या सभा क्रमांक 33 आणि 34 शुक्रवारी (दि. 8) आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात घेण्यात आल्या. यामध्ये अनुक्रमे 19 आणि पाच विषय अजेंड्यावर होते. दुपारी 12 वाजता स्थायी समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरू झाली. यामध्ये महापालिकेच्या शिल्लक निधीची गुंतवणूक राष्ट्रीयकृत बँकेत करण्यास मंजुरी देण्यात आली. या सभेत कोरोना प्रतिबंधक उपायांसाठी लागणारे कीट, जंतूनाशके, हॅण्ड ग्लोज, मास्क आदी खरेदी करण्यास झालेल्या खर्चास आणि नवीन खरेदीसाठी लागणार्‍या दराला मान्यता देण्यात आली. आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात प्रभारी आरोग्य अधिकारी, परिचारिका व कर्मचारी उपलब्ध करून घेण्यासही या वेळी मंजुरी देण्यात आली.
‘इंडिया बुल्स’च्या कोन येथील इमारती विलगीकरण कक्षासाठी महापालिकेने ताब्यात घेतल्या आहेत. त्यातील उद्वाहन दुरुस्ती आणि देखरेख करण्यासाठीच्या खर्चासही सभेत मान्यता देण्यात आली. या सभेत कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी खरेदी करावयाच्या आवश्यक असलेल्या फोमिंग मशीन बाजारात उपलब्ध नसल्याने त्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने मागे घेतला. या सभेच्या पूर्वी विरोधकांनी काही प्रस्ताव दिले, पण स्थायी समितीत अशा पद्धतीने आयत्या वेळी प्रस्ताव देता येत नसल्याने प्रशासनाने ते स्वीकारले नाहीत.

Check Also

संकट काळात ठाकूर कुटुंबियांनी केलेली मदत जनता विसरणार नाही -जरीना शेख

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या संकट काळात लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांतदादा ठाकूर, परेशदादा ठाकूर …

Leave a Reply