Breaking News

संपूर्ण कामोठे कंटेन्मेंट झोन घोषित

पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कामोठे उपनगरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याने संपूर्ण कामोठे हे कंटेन्मेंट झोन (कोरोना विषाणूबाधित क्षेत्र) म्हणून आयुक्त गणेश देशमुख यांनी शुक्रवारी (दि. 8) घोषित केले.
कामोठ्याचे क्षेत्रफळ 2.76 चौकिमी असून, लोकसंख्या 1.13 लाख आहे. येथे शुक्रवारअखेर 54 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. महानगरपालिका क्षेत्रातील एकूण 138 पैकी 40 टक्के रुग्ण एकट्या कामोठ्यात आहेत. त्यामुळे कामोठेबाहेर संसर्ग फैलावू नये यासाठी हा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. यापूर्वी त्या त्या भागातील इमारती, परिसर सील करण्यात येत असत, परंतु आरोग्यदृष्ट्या कामोठे संपूर्णच संवेदनशील झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
कामोठ्यात बाहेरील लोकांना येण्यास व येथील लोकांना बाहेर जाण्यास मज्जाव असेल. फक्त अत्यावश्यक सेवा देणारे नोंद करून जाऊ शकतील. या आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply