Breaking News

दिवीलमध्ये दाम्पत्याला पूर्ववैमनस्यातून मारहाण

15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पोलादपूर : प्रतिनिधी – पोलादपूर तालुक्यातील दिवील गावात जुन्या वादातून पती, पत्नी आणि पतीच्या पुतण्याला जमावाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी 15 जणांविरुद्ध पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी प्रियंका प्रकाश देवे आणि तिचा पती प्रकाश बाबू देवे तसेच पुतण्या हे बुधवारी रात्री दिवील कुंभारकोंड येथे त्यांच्या नातेवाईकांकडे जेवणासाठी गेले होते. त्या वेळी त्यांच्याशी अनंत चांढवीकर, रुपेश चांढवीकर, तुषार चांढवीकर, विवेक चांढवीकर, विठ्ठल चांढवीकर, गणेश चांढवीकर, जितेश चांढवीकर, निलेश देवे आणि अन्य 10 ते 15 जणांनी जुन्या वादावरून तसेच गावाच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या कमानीच्या नव्या वादाविषयी बाचाबाची केली. त्या वेळी आरोपींनी बेकायदेशीरपणे जमाव करून फिर्यादी यांचा पती प्रकाश देवे याला लाथा-बुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. या वेळी त्यांचा मुलगा मनीष याने दिवील कुंभारकोंड येथून त्यांच्या मालकीची रिक्षा (एमएच 060बीव्ही 0580) आणून दिवील कुंभारवाडी येथे फिर्यादींना घेऊन जाण्यासाठी आणली असता, पुन्हा आरोपींनी गावाबाहेर फिर्यादीच्या अंगावर धावत जाऊन शिवीगाळ केली आणि फिर्यादी, त्यांचे पती आणि पुतण्याला मारहाण केली.

जखमी फिर्यादी प्रियंका देवे आणि तिचा नवरा प्रकाश देवे यांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालय व तेथून माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिघांना मारहाण केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणी पोलादपूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply