Breaking News

पंतप्रधान मोदींविषयी बेताल वक्तव्य करणार्या पटोलेंवर गुन्हा दाखल करा

कामोठे भाजयुमोची मागणी; पोलिसांना निवेदन

कामोठे : रामप्रहर वृत्त

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीचे निवेदन भारतीय जनता युवा मोर्चाचे कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षकांना दिले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केले होते. पटोले यांनी मोदींना मारू शकतो आणि मोदीला शिव्या देऊ शकतो, असे बेताल वक्तव्य नागपूर येथील एका कार्यक्रमात केले. याचे सर्वत्र पडसाद उमटले आहेत.

देशाचे पंतप्रधान हे कोणत्या एका पक्षाचे नसून संपूर्ण भारताचे नेतृत्व करणारे सक्षम पंतप्रधान व्यक्ती आहेत. त्यांच्याविरोधात असे बेताल वक्तव्य करणे हे देशद्रोही कृत्य आहे. त्याबद्दल आम्ही भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे शहर मंडलतर्फे आपणास या पत्राद्वारे विनंती करतो की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून यापुढे कोणतीही व्यक्ती भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करण्याची हिंमत होणार नाही. पंतप्रधान हे भारताचे सर्वोच्च पद आहे आणि या पदाचा आपण अभिमान राखला पाहिजे. हा अर्ज स्विकारून आम्हाला योग्य ते सहकार्य करावे, असे हर्षवर्धन पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.निवेदन देतेवेळी भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, सरचिटणीस नवनाथ भोसले, चिटणीस प्रवीण कोरडे उपस्थित होते.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply