Breaking News

बनावट ई-पास बनविणारी टोळी गजाआड

पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई

पनवेल ः वार्ताहर

रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात येणार्‍या प्रवासी ई-पासची बनावट प्रतिकृती बनवून त्याचा गैरवापर झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या बनावट ई-पासचा वापर करून पनवेल ते जालना असा प्रवास करणार्‍या टोळीला पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या विशेष पथकाने गजाआड केले आहे. यासंदर्भात फिर्यादीकडून पनवेल ते जालना असा प्रवास करण्याकरिता ई-पासची बनावट प्रतिकृती बनविण्यात आल्याची माहिती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. (गुन्हे) विजय तायडे, पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे, कादबाने, स. पो. उपनिरीक्षक अंबादास कांबळे, पोलीस हवालदार राऊत, आयरे, पो.ना. मोरे, अमरदीप वाघमारे, पो. शि. सुनील गर्दनमारे, घुले आदींच्या पथकाने सापळा रचून आरोपी मारुती राठोड (21), जावेद शेख (28) आणि सलीम शेख (42) या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून बनविण्यात आलेले बनावट पास व तीन मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत. त्यांच्याविरुद्ध भा. दं. वि. कलम 420, 465, 467, 468, 471, 34सह आयटी अ‍ॅक्ट 66 (क) (ड) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याबाबत पो. नि. (गुन्हे) विजय तायडे अधिक तपास करीत आहेत.

लॉकडाऊन काळात दिल्या जाणार्‍या ई-पासेससाठी कोणाही खासगी व्यक्तीला पोर्टल दिले नसून नागरिकांनी covid19.mahapolice.in या शासकीय लिंकवर जाऊन अधिकृत ई-पास प्राप्त करून घ्यावेत.

-अजयकुमार लांडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply