उरण : प्रतिनिधी, वार्ताहर
उरण तालुक्यातील करंजा गावात बुधवारी (दि. 13) आणखी 44 कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे तालुक्याचा एकूण आकडा 105वर पोहोचला आहे. यातील सात जण बरे होऊन घरी परतले आहेत, तर उर्वरित 98 रुग्णांवर कामोठे एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उरण तालुक्यात पहिल्या आठ कोरोना रुग्णांनंतर करंजा गावातील सुरकीचा पाड्यात एकाच दिवशी 21 पॉजेटीव्ह आढळले. दुसर्या दिवशी 27 नवे रुग्ण समोर आले. मंगळवारी त्यात पाचची भर पडली, तर बुधवारी तब्बल 44 रुग्णांची नोंद झाली. करंजातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालल्याने चिंता व्यक्त होत आहे.
उरण तालुक्यात ऑरेंज झोनही जाऊन आता रेड झोन लागू झाला आहे. त्यातच रुग्णसंख्या वाढत चालल्याने भीतीही वाढत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक नागरिकाने खबरदारी घेणे आता अनिवार्य बनले आहे.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …