Breaking News

बेलवलीत आमदार चषक क्रिकेट स्पर्धा

भाजप नेते राजेंद्र पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील बेलवली येथे भाजपचे गाव अध्यक्ष सतीश पाटील यांच्या माध्यमातून आमदार प्रशांत ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांच्या हस्ते बुधवारी (दि. 23) झाले.
उद्घाटन समारंभास भाजपचे पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, युवा नेते योगेश लहाने, वारदोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच जितेंद्र बताले, ग्रामपंचायत सदस्य हेमंत तांडेल, दिनेश पाटील, योगेश पाटील, अतिश मालुसरे, रामदास ढोपरी, वीरेंद्र ठाकूर, आंबो पाटील, संतोष पाटील, गोपाळ पाटील, भगवान पाटील, बाळाराम जोशी, सोपान चोरघे, आंबो चोरघे, सुभाष पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. ही स्पर्धा 26 मार्चपर्यंत रंगणार आहे.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply