पनवेल : वार्ताहर
सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक जण घरात सुरक्षित असले तरी डॉक्टर, पोलीस, शासकीय अधिकारी व पत्रकार हे 24 हे रस्त्यावरच आहेत. त्यांच्या कार्याला सलाम म्हणून तसेच त्यांच्या जिवीताची काळजी म्हणून शुक्रवारी (दि. 15) रोटरी क्लब ऑफ पनवेल ईलाईट व रोट्ररॅक्ट क्लब ऑफ पनवेल ईलाईटच्या वतीने पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांना तसेच काही ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्यातर्फे फेस शिल्डचे वाटप करण्यात आले.
प्रेसिडंन्ट ऑफ रोटरी क्लब ऑफ पनवेल ईलाईटचेरितेश मुनोत, राजेश मेहता व आदित्य जोशी यांनी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे पदाधिकारी, सदस्य व ज्येष्ठ नागरिक आदींना हे वाटप करण्यात आले. तसेच उर्वरित सदस्यांना सुद्धा हे फेस शिल्ड देण्यात आले आहेत. यावेळी त्यांनी आरोग्याची काळजी घ्या, रोटरीच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक कार्यात सहभाग घेतला जातो. आगामी काळात सुद्धा पत्रकारांना अशा प्रकारे सहकार्याची गरज असल्यास त्यांनी रोटरीच्या पदाधिकार्यांशी संपर्क साधावा असे आवाहन प्रेसिडंन्ट ऑफ रोटरी क्लब ऑफ पनवेल ईलाईटचे रितेश मुनोत यांनी केले.