Breaking News

सिडकोकडून खांदा कॉलनीत पावसाळापूर्वीच्या कामांना सुरुवात

संजय भोपी व गणेश पाटील यांच्या प्रयत्नांना यश

कळंबोली : प्रतिनिधी – सिडकोने दरवर्षीप्रमाणे पावसाळापूर्वीच्या कामांना सुरुवात केली असून खांदा कॉलनी शहरातील गटारे, नाले सफाई, झाडांच्या फांद्याची झाटणी व रस्ते दुरूस्ती करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. पावसाळ्यात गटारे तुंबली जावून शहरात पाणी साचणार नाही याकडे जास्त लक्ष दिले जात आहे. पनवेल महानगपालिका प्रभाग क्रमांक ‘ब’ चे अध्यक्ष संजय भोपी व माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांनी मान्सुनपूर्व कामे करण्यासाठी प्रयत्न केले होते.

गेल्यावर्षी मुसळधार पावसात खांदा कॉलनीमध्ये झाडे पडून मोठ्या प्रमाणात गाड्यांचे नुकसान होवून वित्तहानी झाली होती. येथील रहिवासींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. याचा गांभीर्याने विचार करत संजय भोपी यांनी मान्सुनपूर्व कामे युद्ध पातळीवर करण्याची मागणी निवेदनाने केली होती. त्याप्रमाणे शहरातील मान्सुनपुर्व कामांना प्राधान्य देत शहरातील गटारे, नाले सफाई, रस्ते दुरुस्ती, झाडांच्या फांद्या छाटणीचे काम जोरात सुरु आहे. गटारातील कचरा, माती, गाळ काढला जात आहे.

कोरोना विषाणूने संपुर्ण जगात थैमान घातले असून पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही अडचणी येवू नयेत म्हणून या भीतीच्या वातावरणात सिडकोने शहरातील मान्सुनपूर्व कामांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी संजय भोपी यांनी सिडकोकडे केली होती. या मागणीची दखल घेत सिडकोने पावसाळापूर्वीच्या कामांना खांदा कॉलनीत सुरुवात

केली आहे.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply