मुरूड : प्रतिनिधी
मुरूड तालुक्यातील मीठेखार येथे राहणार्या 28 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मुरूड तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. या महिलेस अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातून हलवून मुंबईतील जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र 11 मे रोजी या महिलेचा मृत्यू झाला. तिचा शवविच्छेदन अहवाल 13 मे रोजी प्राप्त झाला असून, त्यात तिचा मृत्यू कोरोना विषाणूमुळे झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
याबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने डॉ. संजीव दुबे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, संबंधित महिलेला आकडी येण्याचाही त्रास होता. मीठेखार येथील निवासस्थानी ती फक्त काही तासांसाठी होती. दरम्यान, मृत महिलेच्या परिवारातील सदस्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना शासकीय विश्रामगृहात क्वारंटाइन करण्यात आले आहे.
माणगाव तालुक्यात कोरोनाचा शिरकाव
माणगाव : कोरोनाचा माणगाव तालुक्यात शिरकाव झाला असून, कुशेडे तर्फे गोवेले गावातील एका 41 वर्षीय व्यक्तीला या विषाणूची लागण झाली आहे. त्याच्यासोबत कुशेडे गावात अंगणवाडीत स्थलांतरित करून ठेवलेल्या इतर 10 लोकांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार प्रियंका आयरे-कांबळे यांनी प्रतिनिधीला दिली.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …