Sunday , October 1 2023
Breaking News

दिव्यांग मतदारांसाठी आता सरकारी वाहनांची व्यवस्था

नागपूर ः प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीत दिव्यांगांचे मतदान 100 टक्के व्हावे, या उद्देशाने निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी विशेष सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले आहेत. इतकेच नव्हे तर दिव्यांगांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी आणि घरी पोहचविण्यासाठी शासकीय वाहनाची व्यवस्थाही प्रत्येक मतदान केंद्रांवर राहील.

नागपूर जिल्ह्यात एकूण सात हजार दिव्यांग मतदार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे, परंतु हा आकडा कितीतरी मोठा आहे. त्यामुळे दिव्यांग मतदार निश्चित करण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे प्रयत्न केले जात आहेत. नागपूर जिल्ह्यात एकूण 4,382 मतदान केंद्रे आहेत. मतदानाची टककेवारी वाढावी म्हणून निवडणूक आयोग मतदार जनजागृत अभियान राबवत असते. आता अंध, अस्थिव्यंग, कर्णबधिर इत्यादी दिव्यांग मतदारांचेही 100 टक्के मतदान व्हावे, यासाठी निवडणूक आयोगाने विशेष सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले आहेत. जसे प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्प व व्हीलचेअरची सुविधा असेल. गेल्या वर्षी ही सुविधा काही मतदान केंद्रांवर होती, परंतु यंदा ती प्रत्येक ठिकाणी राहावी असा प्रयत्न आहे. यासोबतच दिव्यांग व्यक्तींना मतदान करण्यासाठी त्यांना त्यांच्या घरून मतदान केंद्रावर आणण्यासाठी शासकीय वाहनही उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित मतदान केंद्रातील अधिकार्‍याकडे तशी मागणी करावी लागेल. प्रत्येक मतदान केंद्रात शासकीय वाहन असते.

-विशेष कमिटी स्थापन

दिव्यांगांचे मतदान वाढविण्यासाठी विशेष कमिटी स्थापन करण्यात आली आहे. या कमिटीमध्ये शासकीय अधिकार्‍यासह दिव्यांगांसाठी काम करणार्‍या विविध सदस्यांचा समावेश आहे. ही कमिटी दिव्यांगांमध्ये मतदानासाठी जागृती करण्याचे काम करेल. यासाठी नागपूर शहराच्या मध्यभागी लवकरच दिव्यांगांसाठी एक मदत केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

-खास दिव्यांगांसाठी अ‍ॅप

दिव्यांगांसाठी पीडब्ल्यूडी अ‍ॅप तयार केले आहे. याद्वारे अपंगाने इपीक नंबर टाकल्यास त्याची अपंग मतदार म्हणून नोंदणी होईल. अपंग मतदार निश्चित झाल्यास प्रत्येक मतदान केंद्रात तशी सोय होईल.

Check Also

रायगडात अन्न व औषध प्रशासनाचे धाडसत्र

26 लाख 81 हजारांच्या माल जप्त; परवाना रद्दचीही कारवाई पेण ः प्रतिनिधी गणेशोत्सवादरम्यान सर्व पदार्थ …

Leave a Reply