Friday , September 29 2023
Breaking News

उमेदवारांना सुट्या, करीदिनाची आडकाठी

उस्मानाबाद ः प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीची लगीनघाई आता प्रत्यक्षात सुरू झाली आहे़  दुसर्‍या टप्प्यातील उस्मानाबाद मतदारसंघाची अधिसूचना 19 मार्चला जारी होत आहे़ दरम्यान, सुट्या व चांगल्या-वाईट दिवसांची गोळाबेरीज केल्यास इच्छुकांची पंचाईतच होत आहे़ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची अधिसूचना 19 मार्च रोजी जाहीर होत आहे़ या दिवसापासूनच नामनिर्देशनपत्रांची विक्री व स्वीकृती होणार आहे़  अर्ज स्वीकृतीची अंतिम तारीख 26 मार्च आहे़  छाननी 27 रोजी होणार असून, अर्ज माघारीची मुदत 29 मार्चपर्यंत आहे़  दरम्यान, 19 मार्चचा पहिला दिवस हा नामनिर्देशनपत्र घेण्यातच जाणार आहे़  त्यानंतर 20 तारखेला होळीचा सण आहे़ पारंपरिक विचारधारेनुसार या सणाला बोंबल्याचा महिना म्हणतात़  त्यामुळे या दिवशी अर्ज भरण्याची शक्यता कमीच आहे. 21 तारखेला धूलिवंदनाची शासकीय सुटी असल्याने अर्ज स्वीकृती होणार नाही़  22 तारखेला करीदिन आहे़  साधारणत: हा दिवसही आपल्याकडे अशुभ मानला जातो़  23 मार्चला चौथा शनिवार, तर 24 तारखेला रविवारची सुटी आहे़  त्यामुळे या आठवड्यात अर्ज भरण्यासाठी सण, सुट्यांचा अडसर असणार आहे़  परिणामी, सोमवार व शेवटचा दिवस असलेल्या मंगळवारी अर्ज भरण्यासाठी बर्‍यापैकी गर्दी होऊ शकते, अशी चिन्हे आहेत़  दरम्यान, असे असले तरी जे इच्छुक शुभ-अशुभ मानत नाहीत, त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस हा शुभच म्हणायला हरकत नाही़

Check Also

पनवेलमधील रोजगार मेळाव्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये …

Leave a Reply