हसतमुख स्वभाव, सर्वांना सोबत घेवून काम करणारे व्यक्तीमत्त्व, आणि राजकारण, सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा आदी क्षेत्रात अल्पावधीतच भरगच्च कामगिरी करून आपल्या कार्याची छाप उमटविणारे, तसेच आपल्या व्यक्तीमत्वाने अल्पावधीत मोठे यश संपादन करून समाजामध्ये नावलौकीक मिळविणारे युवकांचे आदर्श स्फूर्तीस्थान म्हणजेच डॅशिंग युवा नेतत्व परेश ठाकूर.
सध्याच्या घडीला कोरोना विषाणू संसर्गने संपूर्ण जगभर थैमान घातले आहे या संसर्गामुळे आणि त्यामुळे आलेल्या लॉकडाऊन परिस्थितीत हातावर पोट असलेल्या मोलमजुरी करणार्यावर संकट ओढवले आहे, मात्र या संकटकालीन वेळेत त्यांना आधार देण्याचे महत्वपूर्ण काम सामाजिक बांधिलकीतून लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली परेश ठाकूर करीत आहेत. 30 हजारपेक्षा जास्त गरजूंना जीवनावश्यक अन्नधान्य वस्तूंचे वाटप करण्याबरोबरच मोदी भोजन कम्युनिटी किचनच्या माध्यमातून दररोज हजारो लोकांना तयार अन्न देण्याचे काम केले जात आहे. त्याचा आजपर्यंत जवळपास 60 हजार नागरिकांना लाभ झाला आहे. विशेष म्हणजे स्वतः त्यांनी यामध्ये लक्ष दिले आहे. प्रत्येकाची ते आवर्जून तब्येतीची विचारपूस करीत आहेत. समाजात लोकांवर आलेल्या आपत्कालीन परिस्थिती दूर न जाता लोकांना गरज कसली आहे याची ते जाणीव ठेवून आहेत. आणि त्या अनुषंगाने ते सतत समाजाची सेवा करताना दिसत आहेत. युवकांची ताकद आणि आदर्श म्हणून त्यांची ओळख आहे. महापालिकेचे सभागृह नेते म्हणून त्यांचे काम वाखाणण्याजोगे आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात सातत्याने विकास झाला पाहिजे यासाठी त्यांचा नेहमी अट्टाहास असतो आणि त्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. त्यामुळेच त्यांनी आपल्या कार्यातून नेहमीच ठसा उमटवला आहे.
रायगड जिल्ह्याचे सुपूत्र तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांचा राजकीय व सामाजिक कर्तृत्वाचा वसा अंगी बाळगत परेश ठाकूर या युवा नेतृत्वाने आपल्या सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, तसेच राजकारण व उद्योजकता क्षेत्रात यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली आहेत. लोकनेते रामशेठ ठाकूर यांची दानशूरवत्ती, आमदार प्रशांत ठाकूर यांचे मार्गदर्शन परेश ठाकूर यांना नेहमी प्रेरणादायी ठरले. तारूण्यातील सळसळते रक्त उत्साह समाजाच्या सेवेत खर्ची घालत त्यांनी आपल्या कार्याची चुणूक दाखवून दिली असून युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता रूजविण्यासाठी त्यांनी तरूणांची मजबूत फळी तयार करून तरूणांमध्ये त्यांनी विचारांची बीज रोवली आहेत. त्यामुळे परेश ठाकूर म्हणजे युवकांसाठी प्रेरणा आणि आदर्श आहे.
पनवेल महापालिकेचे सभागृह नेते म्हणून ते जबाबदारीने काम करीत असून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स, रायगड जिल्हा जलतरण संघटना, अशा विविध संस्था-संघटना माध्यमातून राबविल्या जाणारे सामाजिक उपक्रम, मेळावे, पक्षबांधणी त्याचबरोबर विविध कार्यक्रमात त्यांनी स्वत:ला झोकून दिले आहे. ते सर्व कार्यक्रम-समारंभाचे नियोजन कौशल्य पध्दतीने हाताळत असतात. म्हणून ही सर्व कार्यक्रमे यशस्वी होण्यात परेश ठाकूर यांचा मोलाचा सक्रीय सहभाग असतो. या यशस्वी तरूणाला आज मिळालेले यश खरेतर त्यांच्या आजवरच्या मेहनतीचे व निष्ठेने केलेल्या कामाचे फळ आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करताना सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळेच ते सर्वामध्ये लोकप्रिय झाले. त्यामुळे परेश ठाकूर यांचे राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा आदी क्षेत्रातील भवितव्य अधिक चमकदारपणे पुढे येत आहे. त्यांच्याकडे असलेल्या सामाजिक जाणिवेमुळे आणि त्यांच्या समाजेपयोगी कर्तृत्वामुळे त्यांना विविध पुरस्कार तसेच अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. राजकारणापेक्षा समाजकारणाला ते नेहमीच महत्व देत असतात. सामाजिक बांधिलकी आणि सर्वसामान्यांशी जोडली गेलेली नाळ त्यांना नेहमी समाजसेवेसाठी तत्पर ठेवत असून यापुढेही त्यांच्याकडून समाजाची सेवा अखंडपणे सुरूच आहे. सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत रयत शिक्षण संस्थेच्या विकासासाठी त्यांनी आर्थिक मदत करतानाच आपद्ग्रस्तांना मदत, गोरगरिबांना मदत करण्याचे महत्वपूर्ण काम ते करत असतात.
राज्यस्तरीय एकांकिका अटल करंडक, मॅरेथॉन, काव्यसंध्या, दिवाळी पहाट, मल्हार महोत्सव, विविध क्रीडा स्पर्धा, शैक्षणिक तसेच कला, क्रीडा, आरोग्य महाशिबिर, हजारो विद्यार्थ्यांना वह्या वाटप, राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा, असे अनेक विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असताना यामध्ये परेश ठाकूर यांचे उत्तम नियोजन असते. युवकांच्यासाठी ते सातत्याने विविध उपक्रम हाती घेत त्यांना प्रोत्साहन देत असतात.
सामाजिक न्याय आणि संपूर्ण समाजाला सशक्तीकरण करण्याच्या मुख्य उद्दिष्टासह युवा नेते परेश ठाकूर नेहमीच कार्यरत असतात, त्यांच्या कार्यातून सर्व जाती धर्मातील लोकांच्या विकासाचा विचार दिसून येतो, त्यामुळे त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून युवा पिढीसाठी ते आदर्श आहेत. निःस्वार्थीपणे समाजाची सेवा करणारा आपल्या हक्काचा माणूस म्हणून त्यांची समाजात ओळख असून निःस्वार्थी शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजेच युवा शक्तीचा विचार असलेले नेते परेश ठाकूर होय. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
-हरेश साठे (प्रसिद्धी विभागप्रमुख)