Breaking News

पायी चालत जाणार्यांसाठी राज्य शासनाने बसेसची व्यवस्था करावी -संजयआप्पा ढवळे

माणगाव : प्रतिनिधी

मुंबई, पुणे व अन्य शहरांतून पायी चालत कोकणात आपल्या गावांकडे येणार्‍या नागरिकांचे पुरते हाल होत आहेत. काहींना आपला जीव देखील यामध्ये गमवावा लागला आहे. याकडे राज्य सरकारने गांभीर्यपूर्वक लक्ष देवून वरील अनेक शहरांतून कोकणाकडे येणार्‍या नागरिकांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस अथवा इतर खाजगी बसेसची किंवा रेल्वेची व्यवस्था तात्काळ सुरू करावी, अशी मागणी माणगाव तालुका भाजपचे अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेत्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

ढवळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाऊन काळात शासनाने गावांकडे कोकणात परतणार्‍या नागरिकांसाठी जी व्यवस्था केली ती अपूरी पडत आहे. 145 ते 130 किलोमीटर अंतर दोन तीन दिवस चालत येताना या नागरिकांना अस्वस्थ वाटून चक्कर येण्याचे प्रकार वाढत आहे. कोकणात कामाधांद्यानिमित्त परराज्यातून आलेला मजूर व नागरिकांसाठी शासनाने पनवेलपर्यंत बसेसची व्यवस्था केली आहे. शिवाय तेथून पुढे रेल्वेने व्यवस्था केली आहे. मात्र मुंबई, पुणे व अन्य शहरामध्ये राहणार्‍या कोकणवासीयांना कोकणात आपल्या गावी येण्यासाठी राज्य सरकारने हवी तशी व्यवस्था केली नसल्याने कोकणवासीयांना जीव गमवावे लागत आहेत. याकडे राज्य सरकारने गांभीर्यपूर्वक लक्ष देवून कोकणवासीयांना प्रवसासाठी बसेस अथवा रेल्वेची व्यवस्था तत्काळ करावी, अशी आग्रहाची मागणी संजयआप्पा ढवळे यांनी केली आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply