नागोठणे : प्रतिनिधी
मुंबई, ठाणे, पुणे सारख्या शहरांतील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, ’गड्या आपला गावच बरा’ या उक्तीप्रमाणे चाकरमान्यांनी आपल्या गावाची वाट धरली आहे. त्यातच लॉकडाऊनचे निर्बंध काहीसे शिथिल झाल्यानंतर त्यांच्या संख्येत प्रचंड अशी वाढ होत आहे. नागोठणे सुध्दा त्यात मागे नसून शहरात बाहेरून येणार्या नागरिकांनी चारशेचा टप्पा गाठला आहे. नव्याने आलेल्या प्रत्येक व्यक्तीने शहरात आल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन आपली नोंद करून मगच आपल्या घरात जावे व चौदा दिवस होम क्वारंटाइन व्हावे, अशी आग्रही विनंती स्थानिक जनतेमधून केली जात आहे.