मुरूड ः प्रतिनिधी
मुरूड पोलीस ठाण्यात विविध कामांसाठी असंख्य लोक ये-जा करतात. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वच्छता हे महत्त्वाचे अंग असून येणारे लोक हात स्वच्छ करून यावेत यासाठी मुरूड पोलीस ठाण्यास पुलेकर इंजिनिअरिंग अॅण्ड फॅब्रिकेशन वर्क्सतर्फे टच फ्री सॅनिटायझर मशिन प्रदान करण्यात आली. सॅनिटायझरची बाटली या मशिनमध्ये टाकून पायांच्या साह्याने दाब देताच हातावर सॅनिटायझर पडते व सुलभ स्वच्छता राखण्यास मदत होत आहे. या मशिनचे उद्घाटन मुरूड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनीच स्वच्छतेविषयी दक्ष राहणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने निलेश पुलेकर यांच्या पुलेकर इंजिनिअरिंग अॅण्ड फॅब्रिकेशन वर्क्सकडून टच फ्री सॅनिटायझर डिस्पेन्सर मॅन्युअल मशिन मुरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. या वेळी त्यांचे सहकारी प्रवेश पालशेतकर, युवराज भगत, वसीम अनवरी आदी उपस्थित होते