Breaking News

नांदेडमध्ये मठात घुसून महाराजांसह दोघांचा खून

नांदेड : प्रतिनिधी

पालघर येथील दोन साधूंची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना नांदेडमध्ये एका साधूचा गळा आवळून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याच मठातील बाथरूममध्ये अन्य एका सेवेकर्‍याचा मृतदेह आढळला आहे. या घटनेमुळे नांदेड हादरले आहे.

उमरी तालुक्यातील नागठाणा बु. येथील बालतपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांचा रात्री दीड वाजण्याच्या सुमारास खून झाला. सांगण्यात येत आहे की, एका माथेफिरू तरुणाने महाराजांच्या मठात प्रवेश करून त्यांच्याजवळील ऐवज लुटला आणि त्यानंतर गळा दाबून खून केला. त्यानंतर तो महाराजांचीच गाडी घेऊन पळण्याच्या प्रयत्नात होता, पण शेजारील लोकांना जाग आल्यामुळे त्याने पलायन केले. ज्या मठात शिवाचार्य निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांचा खून करण्यात आला त्या मठातील बाथरूममध्ये अन्य एक मृतदेह आढळला. मृताचे नाव भगवान शिंदे असे आहे. ते मठाचे सेवेकरी होते. या प्रकरणी आता पोलिसांनी एकाला तेलंगणातून अटक केल्याचे वृत्त आहे.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply