Breaking News

चिरनेर नाल्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर

पी. पी. खारपाटील कन्स्ट्रक्शन अ‍ॅन्ड कंपनीकडून माहिती

आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नांतून केला होता निधी मंजूर

चिरनेर : रामप्रहर वृत्त – दरवर्षी चिरनेर गावाच्या पुरपरस्थितीला कारणीभूत ठरणार्‍या उरण तालुक्यातील चिरनेर गावातील महत्वपुर्ण असलेल्या मध्यवर्ती नाल्याचे रूंदीकरण, खोलीकरण आणि बांधबंदिस्तीच्या दोन्ही बाजूंच्या संरक्षण भिंती उभारण्याचे काम पाच ते सहा दिवसांत पुर्णत्वास होणार असल्याची माहिती पी. पी. खारपाटील कन्स्ट्रक्शन अ‍ॅन्ड कंपनीचे सहव्यवस्थापकीय  संचालक राजेंद्रशेठ खारपाटील यांनी दिली.

चिरनेर गावातील पूरपरस्थितीला कारणीभुत ठरणार्‍या या मध्यवर्ती धोकादायक नाल्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अरूंद व गाळाने भरलेला हा नाला पूरपरस्थितीला कारणीभूत ठरत होता. पुरासाठी धोकादायक ठरणार्‍या या नाल्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. नाल्याची डागडूजी देखभाल व दुरूस्ती न झाल्यामुळे नाल्याची अवस्था अत्यंत बिकट झाली होती.

या सर्व घटनांच्या पार्श्वभुमीवर शासनाच्या आपत्कालीप यंत्रणेकडून या नाल्याची पाहणी करून, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नांतून एमएमआरडीएने या नाल्याच्या कामासाठी पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आणि तत्कालिन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते या नाल्याच्या भूूमीपुजनाचा नारळ वाढविण्यात आला होता. या काम पी. पी. खारपाटील कन्स्ट्रक्शन प्रा. लि.या कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्यात आले.

पावसाळयात पावसाच्या विसर्ग नीट व्हावा यासाठी नाल्यातील गाळ व माती तसेच नाल्यातील पाण्याच्या प्रवाहाला अडथळा ठरत असलेले कातळ फोडून नाल्याची खोली वाढवून कामाला सुरूवात केली. गावाच्या अगदी मध्यभागातून जाणार्‍या या 1200 मीटर लांबीच्या या नाल्याच्या दोन्ही बाजूला कॉक्रिटच्या संरक्षण भिंती उभारण्यात आल्या असून या नाल्याच्या तळासाठी सिमेंट कॉक्रिटचा एक फुटाचा रॉप टाकण्यात आला असून हे नॅपचे रॉप आरसीसी स्लॅप आहेत. या नाल्याच्या कामासाठी सेट्रींग, नवीन काँक्रिट पंप, स्टिल कोटींग आदी साहित्य व यंत्रसामुग्री वापरात आणली असल्याचे कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्रशेठ खारपाटील, संचालक समीर खारपाटील व सागरशेठ खारपाटील यांनी सांगितले.

विशेष म्हणजे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पी.पी. खारपाटील हे स्वत: जातीने या कामावर लक्ष ठेवून, कामाची देखरेख करत आहेत. पावसाळयात दरवर्षी या नाल्याला पुराच्या पाण्यामुळे पूर येत आहे. एकंदरीत नाल्यामध्ये झालेली अतिक्रमणे आणि नाल्यात टाकण्यात येणारा कचरा यामुळे पुराचे पाणी अडून गावात पुरद़ृश्य परस्थिती निर्माण होत होती. पुरामुळे नुकसान झालेल्या ग्रामस्थांना प्रशासन तात्पुरती मदत करून, त्यावर तात्पुरती मलमपट्टी करत आहे. चिरनेरच्या पुरग्रस्तांना तब्बल 39 लाख रूपयांची मदत देण्यात आली होती.

अत्याधुनिक यंत्र सामुग्रीने काम मार्गी 

मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण (एमएमआरडीए)च्या माध्यमातुन या नाल्याच्या कामासाटी पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आणि मुहूर्त सापडला. या नाल्याचे काम तातडीने मार्गी  लागावे, अशी अपेक्षा येथील स्थानिक नागरीकांची असताना, हे काम चिरनेर येथील पी. पी. खारपाटील कन्स्ट्रक्शन कंपनीकडे सोपविण्यात आले. दरम्यान कंपनीने अत्याधुनिक यंत्र सामुग्री वापरून हे काम युध्दपातळीवर सुरू ठेवून ते आता पुर्णत्वास नेले आहे.

पुराचे पाणी जाण्याचा मार्ग सुकर

पूरसद़ृश्य परस्थितीमुळे नाल्याच्या मजबुतीकरणाचा हेतू स्वच्छ असून, प्रामाणिकपणे कंपनीकडून बांधकाम केले जात आहे. या नाल्याचे मजबुतीकरण करण्याचे काम प्रगतीपथावर सुरू ठेवून ते आता पाच ते सहा दिवसांत पूर्ण होणार आहे. नाल्याच्या दर्जामुक्त कामामुळे पुराचे पाणी जाण्याचा मार्ग आता सुकर होणार आहे. अशी माहिती पी. पी. खारपाटील कन्स्ट्रक्शन कंपनीकडून देण्यात आली.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply