Breaking News

कोरोनाच्या संकटामुळे घरातच ईद साजरी

नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबई रमजानचा महिना मुस्लिम धर्मियांचा सर्वात पवित्र महिना समजला जातो. तर महिनाभरच्या रोजा केल्यावर व चंद्र दिसल्यावर जगभरात ईद साजरी केली जाते. मात्र सध्या कोविडमुळे संपूर्ण जग थांबलेले आहे. वर्षभर ईदची वाट पाहणार्‍या नवी मुंबईतील मुस्लिम बांधवांनी मात्र काहीशा अनुत्साहाने घरात राहून ईद साजरी केली व या सणाचे पावित्र्य जपले.

रात्री आकाशात चंद्रकोर दिसल्यावर एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देण्यास सुरुवात झाली. यादिवशी सर्व मुस्लिम बांधवांच्या चेंजर्‍यावरून नूर ओसंडून वाहताना दिसत असला तरी कोरोनामुळे मात्र मुस्लिम बांधवांनी घरातच राहणे पसंत केले.  घरी ईदची नमाज पढल्यावर अनेकांनी  गरिबांना अन्न वाटप केले. तर कोरोनाच्या काळात सोशल मीडियाचा वापर करत मुस्लिम बांधवांनी व्हिडीओ कॉल, फेसबुक, व्हॅटसएपवरून नातेवाईकांना, मित्रांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

ईदला आपल्या घराला रंगरंगोटी करून आप्तजनांना आपल्याकडे शिरखुर्मा खाण्यासाठी आमंत्रित केले जाते.मुस्लिम बांधवांचा शिरखुर्मा इतर धर्मियांत प्रसिद्ध आहे. मात्र या सर्व आनंदावर कोरोनाच्या संकटमुळे पाणी फेरले गेल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. ईदच्या शुभ पर्वाला गरीब, अनाथ मुस्लिम बांधव आनंदापासून वंचित राहत असेल तर ती ईद मुस्लिम धर्मासाठी आनंदाची नाही असे मानले जाते. त्यामुळे आवर्जून गरीबांमध्ये शिरखुर्मा व बिर्याणीचे वाटप केला जाते. त्यानुसार नवी मुंबईत अनेक ठिकाणी गरिबांना अन्नाचे वाटप करण्यात आले.

ईदसाठी अनेकांनी काही दिवसांपूर्वीच तयारी केली होती. अनेकांनी फळे व दुध बाजारातून अमून ठेवले होते. कोरोनामुळे सध्या सामाजिक अंतर राखणे, मास्क घालणे या सर्व बाबी महत्वाच्या असल्याने दोन ते तीन दिवसांपासून खरेदी करून बाजारात गर्दी होणार नाही याची काळजी घेतली होती. ईदच्या दिवशी बिर्याणी व शीर कुरमा या पदार्थांना खूप मागणी असते. अनेकांनी रविवारीच मटण व चिकन आणून ठेवले होते. सोमवारी गर्दी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून देखील कडेकोट बंदोबस्त नवी मुंबईतील मुस्लिम बहुल वस्तीत ठेवण्यात आला होता.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply