Breaking News

एक्स्प्रेस वेवर टँकरला आग

जीवितहानी सुदैवाने टळली

खालापूर : प्रतिनिधी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बोरघाटातील अमृतांजन पुलाजवळ गुरुवारी (दि. 10) रात्री ऑइलच्या टँकरला अचानक आग लागली. या आगीत टँकरची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली. 

एक्स्प्रेस वेवर गुरुवारी रात्री पावणेआठच्या सुमारास मुंबईहून पुण्याकडे तेलाचा टँकर जात होता. अमृतांजन पुलाजवळ टँकरला आग लागली. यात टँकरची केबिन   जळून खाक झाली, मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. बोरघाट वाहतूक पोलीस पथक, देवदूत यंत्रणा तत्काळ अग्निशमन दलाच्या बंबासह घटनास्थळी दाखल झाली. त्यांना आग विझवण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply