उरण : प्रतिनिधी, वार्ताहर
उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांची बदली पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्रशासकीय अधिकारी पदावर बदली झाली आहे. अवधूत तावडे यांनी 14 जून 2018 रोजी उरण नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली होती.
मुख्याधिकारी तावडे यांना नगरपरिषद कर्मचार्यांच्या वतीने निरोप देण्यात आला. या वेळी उरण नगरपरिषदेचे सुप्रिडेंट अनिल जगधनी, ओव्हरसियर झेड. आर. माने, म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन आणि कामगार, कर्मचारी कार्याध्यक्ष मधुकर भोईर यांच्यासह नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. तर उरण नगरपरिषदेचा पदभार अद्याप कोणत्याही अधिकार्याकडे सोपविण्यात आला नसून, उरण नगरपरिषदेचे सुप्रिडेंट अनिल जगधनी हे सांभाळत आहेत.