Breaking News

रायगडातील आठ एसटी आगारांमधून होणार मालवाहतूक

अलिबाग : प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) आपल्या बसमधून मालवाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसर आता एसटीच्या आगरांमधून मालवाहतूक करण्यात येणार आहे. रायगड विभागातील एसटीच्या आठ आगार व 13 बसस्थानकांमधून मालवाहतूक केली जाणार आहे.

कोविड-19च्या प्रादूर्भावामुळे संपूर्ण भारतात टाळेबंदी करण्यात आली. त्यामुळे एसटीला तोटा सहन करावा लागला आहे. रायगड जिल्ह्यात देखील दोन महिन्यांत एसटीचे दोन कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी एसटी महामंडाळाने मालवाहतूक सेवेत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य परिवहन महामंडळाची मालवाहतूक रायगड विभागातील आठ आगार व 13 बसस्थानकांमधून  करण्यात येणार आहे. प्रत्येक आगार व बसस्थानकावर आरक्षणाची व्यवस्था केली जाणार आहे. त्याकरिता मालवाहतुकीचे योग्य ते नियोजन करण्यात येणार आहे.

मालवाहतुकीबाबत योग्य माहिती मिळविण्यासाठी राज्य परिवहन रायगड विभागाचे विभागीय कार्यालय, रामवाडी पेण,  8275066400 येथे संपर्क साधावा.

एसटीची सेवा ही विश्वासार्ह व सुरक्षीत आहे. या  मालवाहतुक सेवेचे दर माफक आहेत. मालवाहतूक सेवेचा लाभा सर्वांनी  घ्यावा.

 – अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक, रायगड

Check Also

अखिल भारतीय टेबल टेनिस स्पर्धेत स्वस्तिका घोष विजेती

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त अखिल भारतीय आंतर संस्थात्मक टेबल टेनिस …

Leave a Reply