Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांना मताधिक्य मिळवून देणार -अमित जाधव, प्रमोद भिंगारकर

पनवेल : रामप्रहर वृत्त

भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना पाली देवद जिल्हा परिषद गटातून मोठे मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव आणि विचुंबे ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भिंगारकर यांनी व्यक्त केला आहे. जाधव व भिंगारकर पुढे म्हणाले की, आमदार प्रशांत ठाकूर यांनी संपूर्ण पनवेल विधानसभा मतदारसंघात विकासकामांचा झंझावात निर्माण केला आहे. त्या अनुषंगाने पाली देवद जिल्हा परिषद विभागामध्ये देखील विकासाची कामे झाली आहेत. म्हणूनच मागील लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला येथून मताधिक्य मिळवून देण्यात आम्ही यशस्वी ठरलो होतो. आता विधानसभा निवडणुकीतसुद्धा आमदार प्रशांत ठाकूर यांना आम्ही सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मिळून मतांची आघाडी देऊ. आमदार प्रशांत ठाकूर यांचा विजय निश्चित असून औपचारिकता फक्त बाकी आहे. विरोधकांनी कितीही वल्गना केल्या, तरी त्यांची डाळ शिजणार नाही, असा टोला शेवटी अमित जाधव व प्रमोद भिंगारकर यांनी लगावला आहे.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply