मुंबई : कोरोना व्हायरसमुळे उद्भलेली मुंबईसह राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. ही परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी झाले आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी खासदार नारायण राणे यांनी केली आहे. राज्यातील परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी त्यांनी सोमवारी (दि. 25) राज्यपालांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. राज्यात अनेकांची उपासमार होत आहे. रोजगार उपलब्ध नाहीत. शिक्षण व्यवस्था कोलमडली आहे. राज्याला आतापर्यंत केंद्र सरकारने भरपूर मदत केली, मात्र तरीही राज्यातील नेते केंद्र सरकारवर टीका करीत आहेत. सरकारी यंत्रणा कशी हाताळावी हे त्यांना कळत नाही. नाचता येईना अंगण वाकडे, अशी महाविकास आघाडी सरकारची परिस्थिती असल्याचा टोला राणे यांनी लगावला.
Check Also
आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …
RamPrahar – The Panvel Daily Paper