पनवेल : वार्ताहर
भाजपच्या माजी नगरसेविका तसेच पनवेल पोलीस महिला दक्षता समितीच्या सदस्या नीता माळी यांनी सध्याच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात अन्नदान तसेच पोलीस बांधवांना वेळोवेळी चहा, कॉफी, पाणी व बिस्कीटे आदींचे वाटप करून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. नीता माळी यांनी कोरोना विषाणूंच्या प्रादूर्भावावर 24 तास रस्त्यावर कर्तव्य बजावित असणार्या पोलीस बांधवांना सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात एक वेळचा चहा व साधी बिस्कीटे मिळणेसुद्धा मुश्किल झाले होते. अशा वेळी त्या धावून गेल्या व त्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस बांधवांना चहा, कॉफी, बिस्कीटे व पाणी हे पुरविले. त्याचप्रमाणे परिसरातील झोपडपट्टीत राहणार्या बांधवांसह माता भगिनींसाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तसेच जेथे गरज लागेल तेथे फेस मास्क, सॅनिटायझर आदी वस्तूंचेही वाटप त्या करीत आहेत.