Breaking News

सोन्याची तस्करी; खालापुरात वृद्ध जेरबंद

खालापूर : प्रतिनिधी

सोन्याची तस्करी करणार्‍या 75 वर्षीय वृद्धाला खालापूर पोलिसांनी शनिवारी (दि. 23) पहाटे सापळा रचून खाजगी बसमधून ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून सुमारे 44 लाख रुपये किमतीचे दागिने जप्त केले आहेत. ते कोल्हापूरला नेण्यात येत होते.

खालापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विश्वजित काईंगडे यांना खबर्‍याने, मुंबईहुन कोल्हापूरला जाणार्‍या एका खाजगी प्रवासी बसमधून सोन्याची तस्करी होत असल्याचे सांगितले होते. त्यानुसार शुक्रवारी रात्रीपासून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार, पोलीस नाईक नितिन शेडगे, हेमंत कोकाटे, रणजित खराडे, पोलीस शिपाई समीर पवार, महिला पोलीस भारती नाईक यांचे पथक मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर खालापूर टोल नाका येथे दबा धरून बसले होते. प्रत्येक खाजगी बसची कसून तपासणी सुरू होती. शनिवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास कोल्हापूर जाणार्‍या खाजगी बसची तपासणी करताना एका वृद्धाची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याच्या सामानाची झडती घेतली. त्या वेळी कपड्यात लपविलेले सोन्याचे दागिने आढळून आले. पोलिसांनी विचारणा केली असता, वृद्धाने समाधानकारक उत्तर न दिल्याने त्याला सविस्तर चौकशीकरिता खालापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याच्याकडे जवळपास 1 किलो 471 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने सापडलेे असून, त्यांची बाजारभावाप्रमाणे किंमत 44 लाख रुपये आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply