Breaking News

लॉकडाऊनसंदर्भात गृहमंत्री शाहांची सर्व मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कोरोनाच्या संकटामुळे देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. हे चौथे लॉकडाऊन संपण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून चर्चा केली. लॉकडाऊनसंदर्भात राज्यांच्या भूमिका काय आहेत याबाबत गृहमंत्र्यांनी चर्चा केल्याची माहिती आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी लॉकडाऊन वाढवला जावा की नको या विषयावर चर्चा केली. सोबतच कोरोना विषाणूवर नियंत्रण आणण्यासाठी आणखी काय प्रभावी पावलं उचलली जाऊ शकतात, यावर मुख्यमंत्र्यांची मते जाणून घेतली.
लॉकडाऊनचा चौथा टप्पा 31 मे रोजी संपत असून केवळ दोन दिवस उरलेले असल्याने गृहमंत्र्यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत कोरोनाच्या स्थितीवर विस्तारपूर्वक चर्चा केली. सोबतच पुढे काय करायचे यावरदेखील सूचना त्यांनी मागवल्या आहेत. तसेच निर्बंध शिथिल करणे आणि अन्य काही सूट द्यावी का याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती आहे.
आज होणार घोषणा?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनचा चौथा टप्पा 31 मे रोजी संपत आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील रणनीती ठरवण्यासंबंधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि काही इतर वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. लॉकडाउन वाढवण्यासंबंधी शनिवारी (दि. 30) निर्णय होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसलेला असून, काही निर्बंध शिथिल करीत अर्थव्यवस्था
पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply