पनवेल : वार्ताहर – अवघ्या आठवडाभरावर येवून ठेपलेल्या पावसाच्यापुर्वेला पनवेल महानगरपालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त सुधाकर देशमुख यांनी काही अधिकार्यांसह पनवेल परिसरातील विविध ठिकाणच्या मान्सूनपूर्व आपत्कालीन परिस्थितीचा पाहणी दौरा केला.
पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पुरपरिस्थिती निर्माण होते. त्याअनुषंगाने आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पाहणी दौरा करण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने नॅशनल हायवे विभागाचे एक्झीक्यूटीव्ह इंजिनिअर, डेप्युटी इंजिनिअर तसेच पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त 1 व उपायुक्त 1, सहायक आयुक्त, शहर अभियंता, प्रभाग अधिकारी, स्वच्छता निरिक्षक, अग्निशमन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या दौर्यामध्ये पूर प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने गाढी नदीवरील एनएच 4 वरील पुलाच्या खालील गाळ काढण्याकरीता उपाययोजना करण्याच्या कामाची आयुक्तांनी पाहणी केली. तसेच नवीन पनवेल, ए-टाईप इमारतीमध्ये ब कळंबोली केएलई या इमारतीमध्ये कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याकरीता उपाययोजना करण्याच्या कामाची आयुक्तांनी पाहणी केली.