Breaking News

आठवड्यातून दोन दिवस कपड्यांची दुकाने उघडण्यात यावीत

पनवेलमधील कापड व्यापार्‍यांची मागणी

पनवेल : वार्ताहर

पनवेलमधील कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या 400 झाली असताना व पनवेल विभाग रेडझोनमध्ये असून लॉकडाऊन काळामध्ये सुद्धा काही गारमेंटचे दुकान सुरू असताना पनवेलमधील कापडगल्ली येथे काहीसाडी दुकानांमध्ये गर्दी होत असून सोशियल डिस्टन्सिंगचे पालन न करता दुकान मालक व कामगार नियमांचे उल्लंघन करत आहेत, त्यामुळे आठवड्यातून दोन दिवस कपड्यांची दुकाने उघडी करण्याची परवानगी द्यावी जेणकरुन होणारी गर्दी कमी होईन. असे पनवेलच्या कापड बाजारातील व्यापार्‍यांनी सांगितले आहे. साड्यांच्या दुकानांमध्ये एक साडी घ्यायला संपूर्ण परिवार येत असून चार ते पाच जण तरी एका व्यक्तीच्या मागे येत असतात तसेच कापड बाजारातील रस्ते हे अरुंद असून त्यामध्येच चारचाकी व दुचाकी वाहने रस्त्यावर पार्क असल्याने गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे, असे मत कापड बाजारातील व्यावसायिकांनी मांडले. तसेच आम्ही नुकतेच पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल महापालिका आयुक्तांना साडीची व कपडा दुकाने आठवड्यातून दोन दिवस उघडण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे लवकरच त्यावर निर्णय होईल व आठवड्यातून दोन दिवस कपडा व साडी दुकाने उघडली गेल्यास गर्दीचे प्रमाण देखील कमी होईल असे मत कपडा व साडीच्या व्यापार्‍यांनी मांडले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply