Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरास उरणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

उरण ः वार्ताहर

कोरोना महामारीच्या काळात अनेक रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रक्ताची ही तूट भरून काढण्यासाठी भाजप युवा मोर्चा उरणच्या वतीने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी

(दि. 31) जेएनपीटी टाऊनशिप मल्टीपर्पज हॉल उरण येथे दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 101 रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फू र्त प्रतिसाद दिला.

 पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर संपन्न झाले. उरणचे आमदार महेश बालदी यांनी या वेळी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे आयोजक उरण तालुका युवा मोर्चा अध्यक्ष शेखर पाटील होते. या शिबिरास डी. वाय. पाटील ब्लड बँक टीमने सहकार्य केले.

शिबिरास पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, भाजप उरण शहर अध्यक्ष कौशिक शाह, उरण नगर परिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे, चंद्रकांत घरत, सुधीर घरत, रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष मयुरेश नेतकर, उरण तालुका युवा मोर्चा अध्यक्ष शेखर पाटील, महालन विभाग अध्यक्ष महेश कडू, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, उरण तालुका महिला अध्यक्षा राणी म्हात्रे, उरण शहर महिला अध्यक्षा संपूर्णा थळी, भाजप तालुका उपाध्यक्ष पंडित घरत, भाजप तालुका सरचिटणीस सुनील पाटील, भाजप तालुका सरचिटणीस दीपक भोईर, नगरसेवक राजेश ठाकूर, नगरसेवक मेराज शेख, नगरसेवक नंदू लांबे, नगरसेविका स्नेहल कासारे, नगरसेविका यास्मिन गॅस, कामगार नेते सुरेश पाटील, बोकडवीरा सरपंच मानसी पाटील, जसखार सरपंच दामूशेठ घरत, पाणजे सरपंच करिष्मा भोईर,  खोपटे सरपंच विशाखा प्रशांत ठाकूर, नवीन शेवा सरपंच निशांत घरत, उरण शहर भाजप युवक अध्यक्ष निलेश पाटील, चाणजे विभाग अध्यक्ष जितेंद्र घरत, शेखर तांडेल, हरेश्वर भोईर, देवेंद्र घरत, अजित पाटील, स्वप्नील कासारे, शशी पाटील, देवेंद्र पाटील, समीर मढवी, हितेश शाह, मनन पटेल, अजित भिंडे, मोरेश्वर पाटील, रोहन म्हात्रे, प्रेमनाथ मढवी, सुनील पेडणेकर, प्रशांत ठाकूर, सुरज म्हात्रे, डी. वाय. पाटील ब्लड बँकेचे डॉ. प्रसाद कुलकर्णी, न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदिश शेलकर, मिलिंद पाटील, मुकुंद गावंड, प्राध्यापक प्रमोद म्हात्रे, ज्ञानेश्वर भोईर, सागर मोहिते, भाजप नवघर अध्यक्ष जयप्रकाश पाटील, हेमंत भोंबले तसेच भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply