Breaking News

आजपासून चार दिवसांसाठी मुरूडची बाजारपेठ बंद

मुरूड ः प्रतिनिधी

मुरूड शहरातील मसाल गल्ली परिसरात एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने सदरचा परिसर मुरूड पोलिसांनी सील केला आहे. तसेच सोमवारपासून चार दिवसांसाठी मुरूड बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी सर्वपक्षीय सभा रविवारी (दि. 31) पाटील खानावळ येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेस सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित होते. मुरूड बाजारपेठेतील सर्व दुकाने सोमवार व गुरुवारी बंद राहतील. चार दिवसांच्या बंदमध्ये सर्व औषधांची दुकानेसुद्धा बंद ठेवण्यात येणार असल्याचे समजते. या सभेत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी बाजारपेठ चार दिवस बंद करण्यात यावी. यासाठी व्यापारीवर्गाला विश्वासात घेऊन बाजारपेठ बंद करू. त्याचप्रमाणे निर्मल स्वच्छ अभियानांतर्गत मुरूड नगर परिषदेस अडीच कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. हे पैसे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी खर्च करण्याची अनुमती मिळवण्यासाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री व जिल्हाधिकार्‍यांकडे पत्रव्यहार करण्याचे सर्वसहमतीने ठरविण्यात आले.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply