Breaking News

बालई हद्दीत अन्नधान्याचे वाटप

उरण : वार्ताहर

ग्रुप ग्रामपंचायत चाणजे मधील काळा धोंडा-बालई व बालई भाट या विभागातील भारतीय जनता पक्षाचे कणखर कार्यकर्ते, तसेच माघी गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक हेमंत भोंबले व त्यांचे सहकारी व राजेश म्हात्रे यांनी स्व खर्चाने आपल्या विभागातील प्रत्येक घरात अन्नधान्याचे वाटप केले.या वेळी भारतीय जनता पक्षाचे उरण तालुका अध्यक्ष रवि भोईर व नागाव ग्रामपंचायत सदस्य, भूपेंद्रशेठ घरत व कोटगाव अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र गणपत भोईर यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. तसेच महेश माळी, राकेश पाटील, योगेश म्हात्रे, मंगेश माळी, प्रियेश माळी, दिलीप पाटील, अजित भोईर, भूपेंद्र भोईर, मंथन भोईर, तेजस भोईर, ब्रिजेश भोईर, मिहिर भोंबले, विशाल भोंबले, हर्ष भोंबले, वीरेंद्र भोईर, स्वराज भोईर, भारत पाटील, विश्वास पाटील, मृणाल पाटील, प्रशांत माळी, स्वप्नील पाटील, सन्नी भोईर, अमित म्हात्रे, प्रितेश पाटील, इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply