Breaking News

बहुत जनांसि आधारू…

ज्यांच्या समाजकारणाची मुळेच जनकल्याणाच्या ध्यासामध्ये आहेत असे आपले सगळ्यांचे अतिशय प्रिय आणि आदर्श लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा आज वाढदिवस. गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारे दानशूर व्यक्तिमत्त्व ही त्यांची जनमानसावर कोरली गेलेली प्रतिमा. सर्वसामान्य स्थितीत सतत माणसांमध्ये रमणारे रामशेठ आजच्या कोरोनाच्या अभूतपूर्व संकटकाळातही जनसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.

दोन महिन्यांच्या लॉकडाऊनने ठप्प झालेली अर्थव्यवस्था रूळावर आणण्यासाठी देश न डगमगता खंबीरपणे पावले टाकत आहे. देशातील पाचवा लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवण्यात आला असला तरी लॉकडाऊनचे नियम टप्प्याटप्प्याने शिथिल केले जात आहेत. एकीकडे हे प्रयत्न सुरू असतानाच देशातील कोरोना संकटाचे ढग गडद तर होणार नाहीत ना, याची चिंताही सगळ्यांना सतावत आहे. महाराष्ट्रात तर सुरुवातीपासूनच कोरोनाबाधितांची संख्या देशातील सर्वाधिक असून यात मुुंबई व मुंबई महानगर प्रदेशातील रुग्णांचा आकडा मोठा आहे. वाढत्या शहरीकरणामुळे मुंबईनजीकच्या पनवेल शहरातील आणि पर्यायाने तालुक्यातील लोकसंख्या गेल्या काही वर्षांत बरीच वाढली आहे. अर्थातच कोरोनाचा फैलाव पनवेलमध्येही बराच झाला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात रविवारपर्यंत 2946 टेस्ट करण्यात आल्या असून यापैकी 526 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, मात्र तालुक्यातील रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 59.89 टक्के इतके आहे. हा आकडा निश्चितच दिलासादायक असला तरी आतापावेतो 22 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गेली अनेक वर्षे तालुक्यातील सगळ्याच लहानमोठ्या प्रश्नांकडे बारकाईने आणि जातीने लक्ष देणारे लोकनेते रामशेठ ठाकूर या जागतिक संकटातही गोरगरीब जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. लॉकडाऊन पुकारण्यात आल्यानंतर हातावर पोट असलेल्या अनेकांची उपजीविका अडचणीत आली. अशा वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रेरणेने आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर व त्यांच्या सहकार्‍यांनी गोरगरिबांना अन्नधान्याचे वाटप केले. पनवेल शहर व तालुक्यात 35 हजारांहून अधिक लोकांची अन्नधान्याची गरज भागवण्याचा प्रयत्न करण्यात आला. याखेरीज अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप असो वा मास्कचे वाटप माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्यांची कोरोनासंबंधित हरएक गरज भागवण्याचा प्रयत्न अव्याहतपणे सुरू आहे. कुणीही गरजू रामशेठ यांच्या समोरून रिक्त हस्ते परतत नाही. कोरोनाच्या या अभूतपूर्व संकटकाळातही लोकनेते रामशेठ ठाकूर शक्य तितक्या अधिकाधिक लोकांपर्यंत सर्व प्रकारची मदत पोहचवण्याचा प्रयास करीत आहेत. संकट मोठे आहे. राज्यातील तीन चाकी सरकार तर या संकटाने भांबावल्यासारखेच झाले आहे. कोरोना महामारीचा जबरदस्त फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत आता सातव्या क्रमांकावर पोहचला आहे. सोमवारी देशभरातून सुमारे 8392 केसेसची नोंद झाली. यापैकी दोन हजारांहून रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता एक लाख 90 हजारांच्या पुढे गेली आहे. अशा वेळी स्थानिक पातळीवर झोकून देऊन हरतर्‍हेने जनतेची सेवा करणार्‍या, मदतीला धावून जाणार्‍या खंबीर नेतृत्वाची गरज आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर हे एखाद्या आधारवडासारखे जनतेच्या पाठीशी उभे आहेत हे आपले भाग्यच आहे. सध्याच्या कोरोना संकटामुळे आपल्या वाढदिवसाचा सोहळा न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. सगळ्यांना सदोदित प्रेरित करणार्‍या लोकनेते रामशेठ ठाकूर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply