

पनवेल ः भाजपचे नवीन पनवेल अल्पसंख्याक मोर्चाचे उपाध्यक्ष इमरान खान यांचा वाढदिवस बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी इमरान खान यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष अमन अख्तर, सदस्य हैदर अली आदी उपस्थित होते.