Breaking News

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दोन लाखांच्या पार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासांत 8909 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली असून, ही संख्या एका दिवसातील सर्वाधिक आहे. नव्या रुग्णांमुळे कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा दोन लाखांच्या पुढे गेली आहे, तर या विषाणूने आतापर्यंत 5815 लोकांचा बळी घेतला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत एक लाख 303 लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. त्यामुळे रिकव्हरी रेट 48.31 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
भारत कोरोनाविरोधात चांगल्या पद्धतीने लढत असून, केंद्र सरकारने राबविलेल्या उपाययोजना प्रभावी ठरल्या आहेत.  अन्य देशांशी तुलना करता भारत चांगल्या स्थितीत आहे. केवळ रुग्ण संख्येवर लक्ष न देता भारताच्या लोकसंख्येवरही लक्ष द्यायला हवे, असे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी म्हटले आहे. युरोपातील 14 देशांची लोकसंख्या भारताच्या लोकसंख्येइतकी आहे, मात्र तेथे मृत्यू होणार्‍यांची संख्या मोठी आहे. कोविड-19 केसेसमध्ये भारताचा मृत्यू दर 2.82 आहे, तर जगाचा मृत्यू दर 6.13 टक्के आहे. वेळेत केलेल्या उपाययोजनांमुळे हे शक्य झाले आहे, असेही अग्रवाल यांनी सांगितले.
महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण
महाराष्ट्र सर्वाधिक कोरोनाबाधित राज्य ठरले आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 72 हजार 300च्या वर गेली आहे. मंगळवारी एकाच दिवशी 2287 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, 103 लोकांचा बळी गेला. दुसरीकडे आतापर्यंत 31,333 लोकांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply