Breaking News

निसर्ग चक्रीवादळाच्या थैमानामुळे पनवेलमधील जनजीवन विस्कळीत

पनवेल ः प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळाने पनवेल तालुक्यात अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. रस्त्यावर झाडे पडल्याने रस्ते बंद झाले. नागरिकांच्या घरांवरील छपरे उडून गेली आहेत. विजेच्या तारा तुटल्याने अनेक भागांत वीजही नव्हती. त्यामुळे पनवेलमध्ये गुरुवारी (दि. 4) पाणीपुरवठाही होऊ शकला नाही. शुक्रवारीही पाणीपुरवठा होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.  
निसर्ग चक्रीवादळाचा बुधवारी पनवेल तालुक्याला मोठा फटका बसला आहे. या वादळाने अनेकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले. विशेषतः आदिवासी, डोंगर भागामध्ये या चक्रीवादळ आणि पावसामुळे घरांचे मोठे नुकसान झाले आहे. ताडपट्टी (मालडुंगे) येथील आदिवासी सामाजिक कार्यकर्ते गणपत जानू वारगडा यांच्या नवीन घराचे छप्पर वादळाने उडाले.
 दरम्यान, कळंबोली पोलीस ठाण्यावर झाड पडल्याने त्या इमारतीचे मोठे नुकसान झाले. याशिवाय जुना पुणे हायवेवर 45 झाडे पडली होती. पनवेल तालुका पोलिसांनी जेसिबीच्या मदतीने ती बाजूला करून रस्ता सुरळीत केला. नवीन पनवेलमध्येही मोठ्या प्रमाणात झाडे पडून नुकसान झाले. यामध्ये अनेकांच्या गाड्यांच्या काचा फुटल्या. विजेचे पोल पडल्याने अनेक भागात रात्री वीज नव्हती. विजेचे पोल पडल्याने वीजपुरवठा बंद राहणार असल्याने पनवेल महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी दोन दिवस पाणीपुरवठा होऊ शकणार नसल्याचे समजते.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply