Breaking News

तारा भाजपतर्फे मोफत सॅनिटायझर फवारणी

पनवेल ः प्रतिनिधी

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उरणचे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप कार्यकर्त्यांकडून तारा गाव परिसरात मोफत सॅनिटायझर फवारणी करण्यात आली.

हा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल तारा ग्रामस्थांकडून भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात आले.

तारा गाव बूथ अध्यक्ष जितेंद्र पाटील, पनवेल तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष दिनेश पाटील, तारा गाव बूथ उपाध्यक्ष हरेश्वर पाटील तसेच तारा गावातील भारतीय जनता पक्षाच्या सहकार्याने संपूर्ण तारा गाव, कर्नाळा ग्रामपंचायत कार्यालय, गावातील मंदिरे, तारा गाव नवीन वसाहत तसेच युसूफ मेहेरअली हॉस्पिटल येथे पूर्णपणे मोफत सॅनिटायझर फवारणी करण्यात आली.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply