
पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त वंदे मातरम टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. बसस्थानकासमोरील पनवेल ते दहिसर टॅक्सी स्टॅण्डच्या सभोवतालचा परिसर या वेळी स्वच्छ करण्यात आला. संघटनेचे उपाध्यक्ष रवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम झाला.