अलिबाग : प्रतिनिधी – निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने वीज यंत्रणा कोलमडली आहे. आजही अनेक गाव अंधारात आहेत. रायगडचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रायगडचा दौरा करून वीज पुरवठा सुरु करण्या संधर्भात सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला.
महावितरणचे कार्यकारी अभियंता तपासे यांच्याबरोबर रायगडचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी चर्चा केली व कामांचा आढावा घेतला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन डावखरे, भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते आदी उपस्थित होते.
रोहा : तालुक्यातील भुवनेश्वर कालवा रोड येथील घरांची माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पाहणी केली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन डावखरे, भाजप अध्यक्ष अॅड. महेश मोहिते, उपाध्यक्ष वेंकुठ पाटील, सरचिटणिस मिलिंद पाटिल, भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमित घाग, ज्येेष्ठ नेते संजय कोनकर, तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर आदी उपस्थित होते. (छाया : महादेव सरसंबे)