Breaking News

जेएनपीटी बंदराच्या प्रतिनिधींची कार्यशाळा

उरण : प्रतिनिधी  : देशातील प्रमुख बंदरांच्या प्रतिनिधींसाठी जेएनपीटीने बंदराच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजी व पब्लिक रिलेशनवर आठवडाभराची कार्यशाळा आयोजित केली होती. ही कार्यशाळा अद्ययावत सुविधा असलेल्या जेएनपीटी-अँटवर्प पोर्ट ट्रेनिंग सेंटर येथे आयोजित करण्यात आली होती. नेहमीच पोर्ट प्रतिनिधींसाठी अशा प्रकाराच्या कार्यशाळा आयोजित करण्यात येत असतात. त्यामुळे प्रतिनिधींच्या कामात सुधारणा होऊन गुणवत्ता व उत्पादनक्षमता वाढीस लागण्यास मदत होते.

एकंदरीत बंदराच्या प्रगतीच्या धोरणामध्ये मार्केटिंग आणि पीआर एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आजच्या डिजिटल पद्धतीने कनेक्ट केलेल्या परिस्थितीत जेव्हा आम्ही नवीन बाजारपेठ किंवा भागीदारीचा शोध घेत असतो, तेव्हा आमची प्रसिद्धीच आम्हाला अगक्रमी राहण्यास सहकार्य करते. बंदराच्या एकूण व्यवसायाची प्रगती वार्षिक प्रगतीपत्रातून दिसून येते, परंतु बंदराच्या इतर महत्त्वाच्या गोष्टी सेवा, दर्जा, विश्वासार्हता, ग्राहकांशी नाते आणि समुदायाबरोबर सवांद या सर्व बाबी मार्केटिंग स्ट्रॅटेजीद्वारे अधिक उत्तमरीत्या सादर करता येतात. या सर्व एकत्रित गोष्टी बंदराची प्रतिष्ठा निर्माण करीत असतात. जे जागतिक बाजारपेठेत आपले अस्तित्व वाढवणार्‍या ध्येयासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. असे या उपक्रमाबाबत जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी म्हटले आहे.

आठवडाभराच्या या सेमिनारमध्ये भारतातील प्रमुख बंदरांमधून 14 प्रतिनिधींनी या सेमिनारमध्ये भाग घेतला, तसेच या अभ्यासक्रमात, स्ट्रॅटेजिक मार्केटिंगचा परिचय, तसेच पोर्टचे उद्दिष्ट आणि संप्रेषण योजना समजून घेण्यासाठी संपूर्ण पोर्ट धोरण कसे तयार करावे याचा समावेश होता. प्रतिनिधींनी ग्राहकांच्या अपेक्षा कशा ओळखाव्यात, बाजारातील ट्रेंडचे विश्लेषण कसे करावे आणि या स्पर्धेमध्ये पोर्टचे  वेगळेपण दिसून येण्यासाठी एक अद्वितीय ब्रँड म्हणून जागा निर्माण करणे यावर लक्ष्य देण्यात आले. या व्यतिरिक्त, परस्परसंबंध वाढविण्यासाठी आणि वाटाघाटी कौशल्य विकसित करण्यावर सत्र होते. ही कोणत्याही मार्केटसाठी महत्त्वपूर्ण गोष्ट आहे.

अशा प्रकारे सेमिनारने सर्व महत्त्वाच्या पैलूंवर समग्र शिक्षण प्रदान केले जे मजबूत मार्केटिंग धोरण विकसित करण्यास मदत करते. या कार्यक्रमाची सांगता सर्व प्रतिनिधींच्या सत्कार समारोपाने झाली. जेएनपीटी-एंटवर्प पोर्ट ट्रेनिंग अ‍ॅण्ड कन्सल्टन्सी फाऊंडेशन जेएनपीटी (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट), एपीईसी एंटवर्प-फ्लँडर्स पोर्ट ट्रेनिंग सेंटर आणि पोर्ट ऑफ एंटवर्प या दरम्यान सामंजस्य करार असून भारतातील, तसेच परदेशातील प्रमुख पोर्ट, टर्मिनल्स, तसेच खाजगी बंदरांमधील सर्व प्रतिनिधींसाठी खुले आहे. बंदराच्या कामकाजाच्या मुख्य पैलूव्यतिरिक्त, व्यवसाय विकास धोरणे आणि मार्केटिंगसाठी कौशल्य विकसित करणे आणि वेगाने बदलणार्‍या व्यावसायिक वातावरणात प्रभावीपणे नेतृत्व करण्यासाठी वागणुकीत बदल करण्यावर देखील लक्ष दिले जाते.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply