Breaking News

पनवेल तालुक्यात 39 नवीन रुग्ण

एकाचा मृत्यू; 41 जणांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात कोरोनाचे 39 नवीन रुग्ण आढळले असून 41 जणांची कोरोनावर मात केली आहे तर यात पालिका हद्दीत एकाचा मृत्यू झाला आहे.

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी (दि. 8) पनवेल पालिकेच्या रूग्णांमध्ये कळंबोली 14, नवीन पनवेल सात, कामोठे सहा, खारघरसहा आणि पनवेलमधील तीन रुग्णांचा अशा 36 रुग्णांचा समावेश आहे.  तसेच 31 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल ग्रामीणमध्ये सोमवारी तीन नवीन रुग्ण यात ग्रामीणमध्ये विचुंबे, वावंजे आणि शिरढोण येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. 10 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

पनवेल मधील बंदर रोडवरील प्रभाकर निवास मधील 49 वर्षाच्या व्यक्तीचे कोरोनामुळे निधन झाले आहे. कळंबोलीत खिडूकपाडा येथील एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. सेक्टर 1 ई तिरुपती सोसायटीतील एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती सेक्टर 11 मधील एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना व इतर चार व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कामोठेमध्ये सेक्टर 16 कृष्णाई  निवास 69 वर्षीय महिला,  सेक्टर 34 मधील 30 वर्षीय महिला, सेक्टर 35, 25,11 आणि 10 मधील प्रत्येकी एक व्यक्ती बाधित झाली आहे. 

खारघरमध्ये खुटुक बंधन 70 वर्षीय व्यक्ती, ओवे पेठ यातील एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती, सेक्टर 15 कुंज विहार सोसायटी आणि सेक्टर 35 खारवाणी रोझबेला सोसायटीतील एका व्यक्तीला कोरोना झाला आहे. पनवेलमध्ये रायगड बाजार जवळील 26 वर्षीय व्यक्ती, शिवाजी नगर झोपडपट्टीतील 65 वर्षीय व्यक्ति आणि बंदर रोड वरील प्रभाकर निवासमधील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. नवीन पनवेलमध्ये सेक्टर 17 मधील पीएल-5 मधील एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींना आणि सेक्टर 13 ए टाईप मधील दोन व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे.

पनवेल ग्रामीणमध्ये वावंजे येथील 19 वर्षीय महिला, विचुंबे येथील धर्मा निवासमधील रियल इस्टेटचा एजंट आणि शिरढोण येथील 20 वर्षीय तरुण अशा तीन व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply